मुंबई : नाटककार, लेखक, गीतकार, दिग्दर्शक, जाहिरातींसाठी कॉपी रायटर अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून आपले नाव गाजवणारा चेहरा म्हणजे क्षितिज पटवर्धन आहे. क्षितिजने खूप कमी वेळामध्ये कलाक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नुकतंच त्याला ‘मिर्ची मराठी म्युझिक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
क्षितिजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे सन्मान चिन्हाचा फोटो शेअर केला. आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “५४ चित्रपट, १२५ गाण्यांनंतर पहिलं मिर्ची मराठी म्युझिक पुरस्कार. सर्वोत्कृष्ट अल्बम २०२०-२१ चित्रपट ‘धुरळा’. आता ऑफिशियली स्वतःला गीतकार म्हणायला हरकत नाही.” क्षितिजच्या या पोस्टवर चाहते कमेंट करत त्याचे कौतुक करत आहेत.
क्षितिजने अनेक चित्रपटांसाठी उत्तम गाणी लिहिली आहेत. त्यामध्ये धुरळा’ चित्रपटासाठी क्षितिजने उत्तम गाणी लिहिली. शिवाय या चित्रपटाची पटकथा देखील क्षितीजचीच होती. ‘धुरळा’ या चित्रपटासाठीचं त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. चाहत्यांसोबतच सेलिब्रेटीं देखील याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<