प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनाही झाली कोरोनाची लागण

kumar sanu

मुंबई – बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे. सानूचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी कुमार सानू यांना कोरोना झाल्याची अधिकृत माहिती दिली.

गुरुवारी (15 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने कुमार सानू अमेरिकेतील लॉस एँजिल्स शहरात जाणार होते. पण विमानाने प्रवास करण्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे अमेरिकेत जाणे रद्द झाले. त्यांना मुंबई महानगरपालिकेने होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.

बॉलिवूड जगतातील प्ले बॅक सिंगर म्हणून कुमार यांचं मोठं नाव आहे. दर्दभरे गाणे आणि कुमार सानू असं एक समीकरण बॉलिवूडमध्ये बनलंय. त्यामुळे, कुमार सानू यांचा चाहता वर्गही मोठा आहे.

महत्वाच्या बातम्या:-