मुंबई : सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार सिंगची प्रत्येक गाणी आजवर सुपरहिट ठरली आहेत. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपट किंवा वर्क फ्रंटपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता रॅपर रफ्तार सिंगबद्दल धक्कादायक बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, रफ्तार सिंग आणि त्याची पत्नी कोमल वोहरा यांनी एकमेकांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आहे.
रफ्तार सिंग आणि कोमल वोहरा यांचे ६ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आता या दोघांनी वेगळे राहण्याचा विचार केला माझे. चाहत्यांसाठी ही खूप आश्चर्याची बातमी आहे कारण त्यांच्या चाहत्यांना ही जोडी खूप आवडायची. २०१६ मध्ये रफ्तार आणि कोमलचे लग्न झाले. त्यांचा विवाह प्रेमविवाह होता. लग्नाआधी दोघे एकमेकांना अनेक वर्षे डेट करत होते. २०११ मध्ये दोघेही पहिल्या नजरेत प्रेमात पडले. अशा परिस्थितीत या जोडप्याचे तुटलेले लग्न चाहत्यांसाठी धक्कादायक बाब आहे.
माहितीनुसार, लग्नाच्या काही महिन्यांनंतरच दोघांमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. त्यांच्या घटस्फोटाची माहिती फक्त जवळच्या लोकांना आहे. एक महत्वाची बाब म्हणजे, एकमेकांच्या कुटुंबाविषयी दोघांनाही विशेष प्रेम आहे. रफ्तार आणि कोमलने इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एकमेकांना अनफॉलो केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :