ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन

h m marathe

मराठी साहित्य क्षेत्रात वेगळ्या धाठणीचे म्हणून ओळखले लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे याचं आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, रविवारी रात्री 1.46 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ह. मो. मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. साहित्यिक विश्वात ते हमो या टोपणनावाने ओळखले जातात. नी अनेक कथा, कादंबऱ्यांचे लिखाण केले. लिखाण सोबतच पत्रकारितेच्या क्षेत्रातही ह मो यांचे विशेष कार्य केले. त्यांची पहिली नाटिका 1956 साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. तर साधना साप्ताहिकात प्रकाशित झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ कादंबरीमुळे खरी ओळख निर्माण झाली.

ह मो मराठे यांनी किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. तसेच लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा नियतकालिकांमध्येही लिखाण केले.

 Loading…
Loading...