प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारला कोरोनाची लागण

neymar

फ्रान्स: सेंट जर्मन क्लबचे तीन फुटबॉलपटू कोरोना बाधित झाले आहे. तशी माहिती या क्लबने दिली आहे. पण पॉझिटिव्ह आढळलेल्या या खेळाडूंमध्ये फुटबॉलपटू नेमारचाही समावेश असल्याची बातमी एका क्रीडा वृत्तपत्राने दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू काही दिवसांपूर्वी स्पेनमध्ये फिरायला गेले होते.यानंतर टेस्ट केल्यावर हे सगळे खेळाडू कोरोनामुळे बाधित झाले आहे. सध्या त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बातमीमुळे जगभरातील फुटबॉलप्रेमी चिंतेत आहे.

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दररोज जगभरात कोरोना रुग्णांची संख्या लाखात वाढत आहे.हजारो मृत्यू होत आहे. क्रिडाविश्वातही कोरोनाने शिरकाव केला आहे . मागील काही महिन्यांपासून भारतातच नव्हे तर जगभरात पेक्षकांच्या उपस्थितीत कुठल्याही खेळाचे सामने झालेले नाहीत.आता युरोपमध्ये विनाप्रेक्षक काही सामने खेळवण्यात येत आहेत. त्यातही अडचणी येत आहे आणि यात अशा पद्धतीने खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकत असतील तर पुढील क्रिडाभविष्य अंधारात आहे, अस चित्र सध्या आहे.

३० सप्टेंबर पर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय…

भारतातही अनेक महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना कोरोना झाला होता. आता फुटबॉलपटू नेमारला कोरोना झाल्यानंतर फुटबॉलचे चाहते त्याच्या ठणठणीत होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

अन्यथा सरकारचे आदेश झुगारून मंदिर प्रवेश करु,राज ठाकरेंचा इशारा