New Project | मुंबई : राज्यातील चार मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेले. त्यामुळे राज्यातील जनता राज्य सरकारवर संताप व्यक्त करत आहे. मात्र, नुकत्याच टाटा एअर बसचा प्रकल्प हातून गेल्यामुळे आणखीन ठिंणगी पेटली आहे. अशातच आता महाराष्ट्र (Maharashtra) राज्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्वात प्रसिद्ध (New Project) असणाऱ्या अॅमेझाॅन (Amazon) कंपनीने ठाणे येथे गुंतवणूक केल्याचं समोर येतं आहे.
ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस’ या कंपनीने एक हजार ८४० कोटी रुपयांची जागा खरेदी केली असून, त्यापोटी तब्बल १३० कोटींचे मुद्रांकशुल्क भरल्याचे समोर येतं आहे. घोडबंदर रस्त्याच्या माजीवाडा ते गायमुखदरम्यान दुतर्फा मोठमोठी निवासी संकुले उभी राहत आहेत. याच निवासी संकुलांच्या पार्श्वभूमीवर पातळीपाडा-डोंगरीपाडा परिसरात हिरानंदानी इस्टेट भागात कंपन्यांची मोठी कॉर्पोरेट कार्यालये येऊ घातली आहेत.
यादरम्यान, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या टाऊनशिप तेथे आल्या आहेत. अशा सर्व विकासित क्षेत्राने घेरलेल्या भागात ॲमेझॉनने ही मोक्याची जागा शोधली असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस यांनी बाळकूम पाडा येथील ६० एकर जागा एक हजार ८४० कोटी रुपयांना विकत घेतली असून अनंता लँडमार्क्स या कंपनीकडून ही जागा खरेदी करण्यात आली आहे. तसेच ही कंपनी कल्पतरू समूहाचा भाग आहे. या जमिनीवर अॅमेझॉनकडून डेटा सेंटर उभे केले जाणार आहे, असं देखील समोर येतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “जनाची नाही तर मनाची ठेवा”, टाटा एअरबस प्रकल्पावरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
- Amol Mitkari | “माझ्या जिवाचं काही बरं वाईट झालं, तर…”; अमोल मिटकरींचा शिंदे सरकारला इशारा
- Gulabrao Patil | “50 आमदार एकदम ओक्के, घरी…”; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्ला
- Bhaskar Jadhav | भास्कर जाधवांना राणेंवरची टीका भोवली, कुडाळ पोलिसांनी नोटीस बजावली
- Rana-Kadu | राणा-कडू वाद होणार गोड? दोघेही शिंदे-फडणवीसांच्या भेटीसाठी मुंबईला