प्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेशला कोरोनाची लागण

धर्मेश

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्य आणि देशात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण दिवसेदिवस वाढतच आहे. कोरोनाच्या या लाटेने हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराना आपल्या जाळ्यात ओढले आहे. मागील काही दिवसापासून बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ अनेक कलाकाराना कोरोनाची लागण झाली आहे.

यात बॉलिवूडच्या खिलाडी कुमारला कोरोनाची लागण झाली. याची माहिती अक्षय कुमारने स्वतः ट्विट करून दिली. अक्षय कुमार याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच अभिनेता गोविंदा यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. बॉलिवूड मधील बऱ्याच कलाकारांनी यादरम्यान कोरोनाची लागण झाल्याचे समजले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डान्स दीवाने ३  च्या सेटवरील १८ क्रू मेंबरना कोरोनाची लागण झाली होती. आता या शोचा परिक्षक धर्मेश येलांडेला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोच्या निर्मात्यांनी धर्मेशला कोरोना लागण झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काही दिवस धर्मेश शोमध्ये दिसणार नाही.

 

महत्त्वाच्या बातम्या :