पुणे : पुण्यातील पाषाणकर उद्योग समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली होती. त्याबरोबरच गौतम पाषाणकर यांनी जीवन संपवण्याबाबत लिहिलेली चिट्ठी हाती लागल्यानं खळबळ उडाली होती.
पाषाणकर हे २१ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला. नातेवाई, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरू झाली होती.
यानंतर ते कोल्हापूरमध्ये असल्याचं समजताच पुण्यातील पोलिसांचं पथक त्यांच्या शोधासाठी कोल्हापूरला रवाना करण्यात आले होते. एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते दिसल्याच सांगण्यात आलं होतं. मात्र, यानंतरही पोलिसांच्या हाती ते लागले नव्हते. अखेर आज पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला त्यांचा शोध घेण्यास यश आलं आहे.
पोलिसांच्या या पथकाने राजस्थानमधील जयपूर शहरातून त्यांना ताब्यात घेतलं आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोलिसांना त्यांचा शोध घेण्यास यश आले असून ते तेथील एका हॉटेलमध्ये निवास करत असल्याचं समजत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…तर केंद्र सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकते’; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
- ‘या’ कारणामुळे इंदुरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार!
- ‘दानवे खासदार असल्याचं माहित आहे पण त्यांना ज्योतिषशास्त्र देखील कळतं याची कल्पना नव्हती’
- प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नाही : पाटील
- लस कधी येणार हे सांगू शकत नाही, पण ती सर्वांना उपलब्ध करून देणार – नरेंद्र मोदी