कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे – पंकजा मुंडे

blank

टीम महाराष्ट्र देशा : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने इव्हीएम हॅक केल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हॅकरने केला होता. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना याबाबत माहित होते म्हणूनच पक्षातील नेत्यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप या हॅकरने केला होता.त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. याप्रकरणी चौकशीची मागणी सर्वत्र होऊ लागली. राजकीय नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया यावर येऊ लागल्या आहेत.त्यात आता गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या मंत्री पंकजा मुंडे यांनीही अखेर यावर भाष्य केले आहे.या विषयाचं राजकीय भांडवल करणारी मी राजकारणी नाही, मी हॅकर नाही, तपास यंत्रणा नाही, मी एक कन्या आहे, अशा शब्दात मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, अशा गोष्टींमुळे कुटुंबीयांना मानसिक त्रासातून जावं लागत आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मी स्वतः गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे CBI चौकशीची मागणी केली होती. ती चौकशी पूर्ण झाली आहे. देशातली मोठं मोठी लोकं याची दखल घेतील, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. EVM हॅक होऊ शकत नाहीत हे सिद्ध झालं आहे, असेही मुंडे यावेळी म्हणाल्या.

काय आहे प्रकरण ?

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित हॅकरनं केला आहे. त्यानं लाइव्ह प्रेस कॉन्फरन्स घेतली असून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच पिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे.

सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते असंही त्यानं म्हटलं आहे. शुजा इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरशन ऑफ इंडिया लि.चा कर्मचारी होता असं त्यानं म्हटलं आहे.

गोपीनाथ मुंडेंची हत्या त्यांना ईव्हीएम हॅकिंगची कल्पना होती म्हणून झाल्याचा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित हॅकरनं केला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच पिक्स केल्या होत्या असा आरोप त्यानं केला आहे.