राहुल गांधींनी केलेल्या मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेना खासदारानेही दिला दुजोरा

टीम महाराष्ट्र देशा- राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेच्या वेळी जे मुद्दे उपस्थित केले त्यात तथ्य असल्याचं शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आपल्या भाषणात मांडले होते त्यामुळे या मुद्यांवर शिवसेनेचा राहुल गांधींना पाठिंबा आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.

लोकसभेत सरकारविरोधात पहिल्यांदाच अविश्वास ठराव आणला गेला आहे. त्यानंतर लोकसभेत यावर चर्चा सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान भाजपावर टीकेचे ताशेरे झाडले. राहुल गांधी यांचे हे भाषण इतके वादळी ठरले की लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले.

देशात महिला अत्याचार, जमावाकडून मारहाणीच्या घटना वाढत आहेत मात्र त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक मौन बाळगले आहे. ते अशा घटनांबाबत काहीही बोलत नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधींनी अविश्वास प्रस्तावावर चर्चेच्या वेळी जे मुद्दे उपस्थित केले त्यात तथ्य असल्याचं शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.

भाजप आणि शिवसेनेच्या वादावर अडसूळांचं हे वक्तव्य महत्वाचं समजलं जातं. अविश्वास प्रस्तावावर भाषणं सुरू असताना सर्वांच्या नजरा होत्या त्या राहुल गांधींच्या भाषणाकडे. राहुलने जोरदार फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. भ्रष्टाचार, जातीयवाद, महिलांवरचे अत्याचार असे सगळे मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले. त्यांच्या अनेक मुद्यांवरून वाद आणि गोंधळही झाला. अध्यक्षांना एकदा कामकाज तहकूबही करावं लागलं.

शिवसेना नेत्याने उधळली शरद पवारांवर स्तुतिसुमने !