लबाड कोल्हे म्हणजे अमोल कोल्हे : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : ” राष्ट्रवादी मध्ये सध्या शरद पवार नावाचे एकच कार्यकर्ते शिल्लक राहिले त्या पक्षात इतर सर्वच नेते आहेत. त्यांना शिवसेनेने भेट दिलेले लबाड कोल्हे म्हणजे अमोल कोल्हे, हे दोनच वक्ते सध्या उरले आहेत. कोल्हेंना अभिनेता म्हणून पाहायला अनेकजण येतात.” असा खोचक टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हेना लगावला. कोल्हापुरात आयोजित सभेत पाटील यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता शरद पवार यांच्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांची भेट दिली आहे. अनेक लबाड कोल्हे शिवसेनेमध्ये मोठे होऊन आणि शिवसेनेशी गद्दारी करून निघून गेले, त्यातलेच हे एक लबाड कोल्हे म्हणजे अमोल कोल्हे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. गेल्या पाच वर्षांमध्ये एकदाही शिवसेनेने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेची पाठराखणही केली.

दरम्यान, निवडणुकांना पाचच दिवस रहिले असताना राष्ट्रवादीत काही मोती घडामोड घडली तर कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १०० टक्के फुट पडणार, असा दावाही पाटील यांनी केला. परंतु फुट पडण्यासाठीसुद्धा जास्त लोकं निवडून यावे लागतात. पण फक्त वीसच लोकं निवडून आली तरी फुट काय पडणार? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या :