सोने-चांदी दरात घसरण; जाणून घ्या १० ग्रॅम सोन्याचा भाव

सोने चांदी

नवी दिल्ली : साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणारा दसऱ्याचा सणानिमित्त  सोने खरेदी करण्यासाठी अनेकांचे लगबग चालू असते. अनेकजण या दसऱ्याच्या दिवसासाठी सोने खरेदी करून ठेवत असतात. जर तुम्ही देखील दसऱ्यानिमित्त सोने खरेदी करणार असाल तर हि बातमी तुमच्यासाठी दिलासादायक आहे. कारण आज सोन्याच्या भावात काहीशी प्रमाणात घसरण झाली आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात MCX वर आज ऑक्टोबर डिलव्हरी सोन्याचा भाव 0.20 टक्क्यांनी घसरला आहे. तर चांदीच्या दरात 0.51 टक्क्यांची घसरण झाली आहे.  सोन्याचा भाव आज 0.20 टक्क्यांच्या घसरणीसह 47,819 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदी 0.51 घसरणीसह, 1 किलो चांदीचा आजचा भाव 62,564 रुपये आहे.

गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या 8,381 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र पुढील काळात सोन्या- चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

सध्या सोनं 46 ते 47 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ होऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या