राम मंदिरातून फकीर मोदींनी आपली झोळी भरली, आता हिशोब द्यावा – इम्तियाज जलील

औरंगाबाद : सध्या राम मंदिर हिशोबाचा मुद्दा चांगलाच गरम झाला आहे. आपच्या संजय सिंघांनी राम मंदिराची अडीच जागा कोटीची जागा, तब्बल अठरा कोटी मध्ये घेतल्याच्या आरोपानंतर आता यात एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी आता या वादात उडी घेतली आहे. राम मंदिराचे नाव पुढे करून मोदींनी त्यांची झोळी भरली, परंतु त्याचा हिशोब आता द्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद हे रामाच्या नावाने मत मागतात. मोदींनी देशातील ज्या भाविकांकडून मंदिर निर्माणासाठी पैसे घेतले, त्या पैस्याबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे मंदिर निर्माण होण्याआधीच त्यात भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले आहे. त्यामुळे मोदींनी हिशोब देणे गरजेचे असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी निवडणूक हि राम मंदिराच्या मुद्द्यावर लढवली आणि सत्ता देखील स्थापन केली. त्यामुळे त्यांनी तर आता खुलासा करणे गरजेचे आहे. तसेच पुण्याच्या एका शिक्षण संस्थेने राम मंदिर निर्माणासाठी २१ कोटी निधी दिल्याची माहिती आहे. शिक्षण संस्थांनी पैसे हे सेवा सुविधांवर खर्च करावे, मंदिर,मशीद बांधण्यासाठी तसेच असे धार्मिक कामे करण्यासाठी त्या-त्या समाजाचा पुढाकार असतो. असे खा. इम्तियाज जलील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP