शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होताच भाजपचे पेड ट्रोल लागले कामाला ??

एखादे विकास काम किंव्हा कोणता प्रश्न मार्गी लागल्यावर राजकीय पक्षांकडून केले जाणारे श्रेयवादाचे राजकारण काही नवीन नाही. आज आपल्या न्याय मागण्यांसाठी तब्बल २०० किलोमीटरची पायपीट करून नाशिकचे शेतकरी मंत्रालयावर धडकले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारला लागलीच त्याची दखल घ्यावी लागली. दुपारी मंत्रीगट आणि शेतकरी आंदोलक शिष्टमंडळाची बैठक होवून ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हे सर्व होत असताना आता श्रेयवादाच राजकारण सुरु झाल्याच दिसत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आयटी सेलकडून यासाठी पेड ट्रोलचा वापर केला जात असल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तोच भाजपने मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात ट्रेंड सुरु केल्याचं समोर आल आहे. दरम्यान हा ट्रेंड आधीच फिक्स होता तसेच तो पेड असल्याचा आरोपही केला जात आहे. काल शेतकरी मुंबईत धडकल्यानंतर शेतकऱ्यांच्या मुलांनी आणि शेतीबद्दल प्रेम असणाऱ्या नेटकऱ्यांनी #KisanLongMarch हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड केला. आता या हॅशटॅगला उत्तर देण्यासाठी भाजपने #KisanThanksDevendra हॅशटॅग सुरु केल्याचं कळतंय.

#KisanThanksDevendra हॅशटॅग वापरुन ट्विट पडण्यास सुरुवात झालीय. ही ट्विट पेड असून प्रत्येक ट्विटसाठी 5 रुपये दिले जात असल्याचा आरोप अनऑफिशिअल सुसुस्वामी हँडलवरुन करण्यात आला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

 

https://docs.google.com/document/d/1lVv3Ak3TKXEEj0WeWseCd5T1jUqkPhm75UGtQLezXQ/edit

https://twitter.com/hi_paresh/status/973113180242284549

https://twitter.com/MissionBJP2019/status/973083590463430656

https://twitter.com/aapvin/status/973118578902827008

 

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...