दुचाकीवर बनावट क्रमांक; तिघांविरुध्द गुन्हा दाखल

औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टाकुन फिरणा-या तिघांविरुध्द गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास छावणी परिसरातील इंग्लिश होलीक्रॉस शाळेसमोरुन राजेश रविकांत रानडे (वय ३४) हा दुचाकीने जात असताना त्याला पोलिसांनी थांबवले.

त्यावेळी त्याच्या दुचाकीच्या क्रमांकाची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा बसचा क्रमांक दुचाकीवर असल्याचे समोर आले. त्यावरुन राजेश रानडे, शकील आणि शोहेब यांच्याविरुध्द छावणी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विठ्ठल सुरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना काळात विविध प्रकारे दुचाकी, चार चाकी वरील वाहनांचे क्रमांक बदलून चालवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मागील काही महिन्यात अशा प्रकरणात अनेक जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात गाडीचे हप्ते वाचविण्यासाठी मोठ्याप्रमाणात बनावट क्रमांक टाकल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच अनेकदा चोरीची वाहने देखील सापडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

IMP