‘फेक न्यूज’ हा २०१७ मध्ये सर्वात चर्चेत असणारा ठरला शब्द

Fake News Newspaper

टीम महाराष्ट्र देशा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बहुतांश वेळा वापरला जाणारा ‘फेक न्यूज’ हा २०१७ मध्ये सर्वात चर्चेत असणारा शब्द ठरला आहे कॉलिन्स या शब्दकोश तयार करणाऱ्या ब्रिटन मधील प्रमुख कंपनीने फेक न्यूज हा शब्द यावर्षी जगात सर्वात जास्त चर्चेत राहिल्याचा दावा केला आहे . गेल्या वर्षभरात या शब्दाच्या वापरात तब्बल ३६५ % वाढ झाल्याचे या कंपनीने केलेल्या संशोधनात समोर आलं आहे . वर्ष २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मिडीयावर पक्षपातीपणाचा आरोप करताना या शब्दाचा वापर केला होता . फेक या शब्दाचा अर्थ बातम्यांच्या आडून चुकीच्या पद्धतीने केली जाणारी रिपोर्टिंग असा परिभाषित केला आहे .