बनावट डिग्री प्रकरण : हरमनप्रीत कौरची डीएसपी पदावरुन हकालपट्टी

टीम महाराष्ट्र देशा – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरची पंजाब पोलिसांच्या डीएसपी पदावरुन हकालपट्टी करण्यात आलेली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. 2017 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या हरमनप्रीतची तीच्या या कामगिरीसाठी पंजाब सरकारने पोलिस उपअधीक्षक पदी निवड केली होती.

उपअधीक्षक पदासाठी पंजाब पोलिसांकडून हरमनप्रीतच्या पदवी प्रमाणपत्राची पाडताळणी करताना हरमनप्रीतने पंजाब पोलिसांसमोर बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले होते. यानंतर हरमनप्रीत कौरचे पोलीस उपअधीक्षक पद पंजाब सरकारने काढून घेतले आहे.

दरम्यान,“या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका चांगल्या क्रिकेटपटूच्या कारकिर्दीचे नुकसान होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तसेच भविष्यात जर हरमनप्रीतने पदवी पूर्ण केली तर पोलीस उपअधीक्षक पदासाठी विचार केला जाईल.” पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंंग हरमनप्रीतच्या या प्रकरणावर बोलताना म्हणाले.

Rohan Deshmukh

दूध दर प्रश्नावरून अजित पवारांनी धरले मंत्री जानकरांना धारेवर

निराधार, वंचित घटकांना देण्यात येणाऱ्या रकमेमध्ये वाढ करा – आमदार राणा जगजितसिंह

 

Latur Advt
You might also like
Comments
Loading...