तोतया नगरसेवकांचा धुमाकूळ जोमात ! आणि जिल्हा प्रशासन कोमात !

बदनापूर/ राजेश कानडे: बदनापूर नगरपंचायतमध्ये नेमके किती नगरसेवक आहे हे आतापर्यंत शहरासहित तालुक्यातील सर्व सामान्य जनतेला व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी व विशेष म्हणजे नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे आणि नगरपंचायतमधील कर्मचारी यांना सुद्धा माहित नाही. त्यामुळे तोतया नगरसेवकांचा धुमाकूळ जोमात ! आणि जिल्हा प्रशासन कोमात ! असे म्हणावे लागेल.

बदनापूर नगरपंचायतमधील जनतेतून निवड़ुण आलेले नगरसेवकांची संख्या 17 व स्वीकृत नगरसेवक 2 असे एकुण 19 आहे. परंतु नगरसेवकांच्या घरात एक नगरसेविका किंवा नगरसेवक निवडून आलेले असल्याचा फायदा घरातील इतर मंड़ळी घेत असल्याचे स्पष्ट चिञ यांनी सोशल मिड़ियावर टाकलेले पोस्टर्स वरुन दिसत आहे.

bagdure

बदनापूर नगरपंचायतमधील विद्यमान नगरसेवकांच्या इतर घरातील सदस्यांना शासनाने विशेष अधिकार प्रदान केले की काय? म्हणून एक-एका घरातील 4 ते 5 सदस्य स्वताला नगरसेवक म्हणून मिरवून घेत आहेत. अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करणा-यांनाविरुद्ध प्रशासन कार्यवाही करण्यासाठी दिरंगाई करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने बदनापूर नगरपंचायतमधील नगरसेवकांच्या घरातील इतर मंड़ळीला नगरसेवक म्हणून बॅनर्स लावण्यासाठी व स्वताःला नगरसेवक म्हणून मिरवून घेण्यासाठी मुभा दिलेली आहे का? जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी यांनी तोतयागिरी करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बदनापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांना आतापर्यंत नगरपंचायतमध्ये निवडणुकीत नगरसेवक कोण निवड़ुण आले याची माहिती आहे की नाही? त्यांना नगरसेवकांची माहिती असली तर अंभोरे यांनी आतापर्यंत तोतयागिरी करणाऱ्या नगरसेवकांविरुद्ध कायदेशीर कारवाई का केली नाही? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. नगरपंचायतमधील नगरसेवकांचे घरातील इतर मंड़ळीला नगरसेवक म्हणून बॅनर्स लावणे, स्वताला नगरसेवक म्हणून मिरवून घेण्याचे प्रकार सुरु आहेत.

नगरपंचायतमध्ये विद्यमान नगरसेवकांचे भाऊ, मुलगा, दीर, पती, सासरे, जावईसह इतर नातेवाईक स्वताला नगरसेवक म्हणून मिरवून घेत आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता व प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा संभ्रमात असल्याचे चिञ स्पष्ट दिसुन येते. या नगरसेवकांविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, सुज्ञ जनतेतून होत आहे.

You might also like
Comments
Loading...