पुन्हा या अभिनेत्याच्या नावाखाली लाखोंचा गंडा

सैराट प्रदर्शित झाल्यानंतर परशा म्हणजेच आकाश ठोसर व आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू यांच्या नावाने अनेक सोशल माध्यमावर फेक अकांऊट बनविण्यात आले आहेत. आपले सोशल माध्यमावर अशा प्रकारेचे कोणतेही अकांऊट नसल्याचा निर्वाळा आकाश व रिंकूने वेळोवेळी दिला आहे.  कलाकारांच्या नावाचा वापर करून अनेकदा अनेकांना गंडा घालण्यात आला आहे.  असच काही सैराट फेम आकाश ठोसर बाबत घडले आहे.

आकाशच्या नावाने फेसबुक या सोशल माध्यमावर एक फेक अकांऊट बनविण्यात आले. त्या माध्यमातून अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट देखील पाठविण्यात आल्या. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळून देण्याची संधी अशा आशयाची एक पोस्ट आकाशच्या फेक अकांऊट वरून व्हायरल करण्यात आली. अनेक हौशी कलाकारांनी त्या पोस्टला चांगला प्रतिसाद देखील दिला. पोस्टच्या माध्यमातून अनेकांचे नंबर घेण्यात आले.

मराठी किंवा हिंदीमध्ये काम करायचे असेल तर सिलेक्शन सुरू आहे. तुमची माहिती आणि फोटो या व्हॉटसअप नंबरवर पाठवा. अशा आशयाची पोस्ट आकाश ठोसरच्या नावाने पाठवण्यात आली आहे. या पोस्टनंतर अनेकांनी संबधित नंबरवर फोन केल्याचेही समोर आले आहे. काही जणांकडे पैशाची मागणीही करण्यात आल्याची उदाहरणे आता समोर येऊ लागली आहेत. ज्या अंकाऊट समोर निळ्या रंगाची खूण असेल तेच अंकाऊट व्हेरीफाय असते. कोणताही अभिनेता किवां अभिनेत्री सोशल माध्यमातून आव्हान करीत नसतात . नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये.असे आवाहन कलाकारांनाकडून करण्यात येत आहे.