fbpx

आम्ही राम मंदिर बांधू शकत नाही, मोदींच्या मंत्र्याच मोठं विधान

टीम महाराष्ट्र देशा : आमचं सरकार राम मंदिर बांधू शकत नसल्याचं मोठं विधान केंद्रीय वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल यांनी केलंय. भारतीय जनता पक्षाने कधीही राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवलीच नाही असं देखील ते यावेळी म्हणाले.

उत्तर प्रदेश मधील बिस्ती जिल्ह्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आम्ही मंदिर बांधू शकत नसलो तरी भगवान श्रीराम कायम आमच्या सोबत आहेत, कोर्टातून किंवा परस्परांशी कारारातून काही निर्णय झाला तर राम मंदिर बांधले जाईल असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने काही दिवसांपूर्वीच सरयू नदीच्या किना-यावर श्री रामाची 108 फूट उंच भव्य प्रतिमा उभारण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडून अजून यासाठी मंजुरी मिळालेली नाही, मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केलं जाणार आहे.