‘या’ कारणामुळे फडणवीस लिहिणार मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : दादर जवळील नायगाव येथील पोलीस वसाहतीला गेल्या काही दिवसा पूर्वी घरेखाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर तेथील पाहणी करण्यासाठी व पोलिसांची मदत करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गेले. ही माहिती त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करून दिली.

त्यांनी सांगितले की, कोरोनाची स्थिती, गेल्या 2 वर्षांपासून पोलिस दलावरील ताण, अशात 10 दिवसांत घरे रिकामे करण्याच्या नोटीसा, घरच्यांचा आक्रोश, घरातील आजारी कुटुंबीय अशा ताणात असलेल्या नायगाव वसाहतीतील कुटुंबीयांची आज भेट घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.’ असे ते म्हणाले. दरम्यान, ‘या विषयी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून ती नोटीस रद्द करण्याची विनंती करेल.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पोलीस वसाहतीला भेट देऊन आश्वासन देले कि, तुम्हला आम्ही साथ देऊ, सरकार मदत करत नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. तसेच या विषयावर त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करूनं देखील माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या