‘फडणवीस आमचा मान ठेवतील, शब्द मोडणार नाहीत’, राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांना विश्वास

‘फडणवीस आमचा मान ठेवतील, शब्द मोडणार नाहीत’, राज्यसभा उमेदवारीवरून काँग्रेस नेत्यांना विश्वास

मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने संजय उपाध्याय यांना संधी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. परंतू राज्यसभा निवडणूक टाळण्याच्या हेतून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभा पोटनिवडणुकीतून उमेदवार मागे घेण्याची गळ पटोलेंनी फडणवीस यांना घातली.

या भेटीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपने अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल.’

‘महाराष्ट्रात राजकीय संघर्ष होत असला तरी, नेमक्या कोणत्या काळात विरोधकांना कशी मदत करायची असते, याचे काही अलिखित संकेत आहेत. ते पाळले जावेत, याचसाठी फडणवीस यांची भेट घेतली. ही निवडणूक होऊ नये, अशी मागणी आहे. त्यावर तुर्तास तरी विचार करून निर्णय घेण्याची भूमिका फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत असेल. यापुढच्या काळात भाजपला अशाच स्वरुपाच्या मदतीची गरज भासल्यास ती केली जाईल असे पटोले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या