फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार

फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार

फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार

नवी दिल्ली-  नवीन स्थापन झालेले सहकार मंत्रालय नेहमीच चर्चेत असते. आता याच सहकाराच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत आज एक महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले काही भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे नेते असणार आहेत. दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या या बैठकीसाठी सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना देखील हजर राहण्यास सांगितले गेले आहे.

राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना जवळपास दहा हजार कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस इन्कम टॅक्स खात्याने नुकतीच पाठवली आहे. त्याबाबत कारखान्यांना दिलासा मिळावा अशी सुद्धा मागणी या शिष्टमंडळाकडून केली जाणार असल्याचं सांगितले जात आहे. कारखान्यांची दीर्घ मुदतीची कर्जे पुनर्गठित करण्यात यावीत, निर्यात सबसिडी वाढवून मिळावी या संदर्भात देखील मागण्या या शिष्टमंडळाकडून केल्या जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या