पणजी : कळंगुट मतदारसंघातील भाजप नेते मायकल लोबो (Michael Lobo) यांनी सोमवारी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी डिलायला लोबो यादेखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो या उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होत्या. अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला भाजपकडू तिकीट मिळावं, यासाठी लोबोंचे प्रयत्न सुरु होते. भाजपकडून आशा धुसर झाल्याने त्यांनी अखेर पत्नीसह भाजपला रामराम ठोकला आहे.
मायकल लोबो भाजपचा राजीनामा देणार याची माहिती मिळताच गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस हे मायकल लोबो यांच्या घरी गेले होते. अत्यंत आक्रमक झालेल्या मायकल लोबो यांना थंड करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून झाले असावेत, असे तर्क त्यावेळी राजकीय जाणकारांनी वर्तवले होते. दरम्यान, आता निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेल्यानंतर अखेर मायकल लोबो यांनी कमळाला रामराम ठोकला आहे. काँग्रेसचा हात तर त्यांनी हातात घेतला आहेच. शिवाय आपल्या पत्नीलाही काँग्रेसमध्ये सोबत घेतलं.
मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो या उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होत्या. अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला भाजपकडू तिकीट मिळावं, यासाठी लोबोंचे प्रयत्न सुरु होते. त्या काळात मायकल लोबो यांनी अमित शाह यांची भेटही घेतली होती. दिल्लीतही त्यांनी वरीष्ठ नेत्यांसोबत आपल्या मागण्यांबाबत चर्चा केली होती, मात्र त्यांची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.
महत्वाच्या बातम्या
- “…तर तुमचा मेंदू कुठे आहे तेवढा तपासून पाहा”, पवारांवर केलेल्या टीकेवर आव्हाडांचे प्रत्युत्तर
- रेल्वे सुरक्षा दलात भरतीची ‘ती’ प्रसिद्ध झालेली जाहिरात बोगस?; रेल्वे प्रशासनाने दिली माहिती
- युपीत भाजपला मोठा धक्का; ‘या’ मंत्र्याने केला सपामध्ये प्रवेश
- ‘आता पर्यंत आम्ही तुम्हा खूप…’; न्यायालयाचा परमबीरसिंग यांना दणका
- “पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला असण्याचे कारण नाही”, पडळकरांना छगन भुजबळांचे प्रत्युत्तर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<