अकोला : जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत वाघांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे म्हटले. यावरून आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांचे हे ट्वीट म्हणजे ”आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशा आशयातचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आज जागतिक व्याघ्र दिन आहे. या निमित्त शुभेच्छा देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघांचे संवर्धन झाले पाहिजे, अशा प्रकारचे ट्वीट केले आहे. त्यांचे हे ट्वीट म्हणजे ‘मुह मे राम, बगलमे सुरी’ अशा आशयाचे आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर या सरकारने मेट्रो कारशेड आरेत करण्याचा निर्णय घेतला. हा परिसर म्हणजे मुंबईचा ऑक्सिजन आहे. येते पट्टेदार वाघ, बिबट्यांचा संचार असतो. अशा जंगलावर कुऱ्हाड मारणे आणि दुसरीकडे व्याघ्र दिनानिमित्त शुभेच्छा देणे ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. हा प्रकार म्हणजे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी असा आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । ते शिवसैनिक नाहीत, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Nana Patole : राज्यातील ED सरकार झोपी गेलेलं बहिर सरकार आहे – नाना पटोले
- Ajit Pawar | मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी फिल्डवर उतरून पाहणी करावी; अजित पवारांचा सल्ला
- Tanushree dutta and Nana Patekar | “मला काही झाले तर नाना पाटेकर,…”; तनुश्री दत्ताची खळबळजनक पोस्ट
- Ajit Pawar | “मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी…” ; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<