Devendra Fadanvis । मुंबई ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क बनल्यापासून ते काय निर्णय घेतात याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यात त्यांनी अनेक बदलही केले आहेत. त्यातीलच एक बदल म्हणजे भारतातील 52,141 अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे. 26 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या काळात ही खाती बंद करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आक्षेपार्ह माहिती शेअर केली होती. यामुळे त्यांचं ट्विटर खातं निलंबित करण्यात आलं होतं.
यानंतर आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटरवर पुनरागमन होईल का? याबाबतच्या प्रश्नांचा भडिमार इलॉन मस्क यांच्यावर केला जात आहे. या संदर्भात इलॉन मस्क यांनी एक मिश्किल ट्वीट केलं आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटरवर पुनरागमन होणार का? या प्रत्येक प्रश्नासाठी मला प्रत्येक वेळी मला एक डॉलर मिळाला असता, तर ट्विटर पैशात खेळलं असतं” असं ट्वीट इलॉन मस्क यांनी केलं. हेच ट्वीट रिट्वीट करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
“विरोधक व एचएमव्हीकडून माझ्या आणि पक्षाविरोधात पसरवल्या जाणाऱ्या प्रत्येक खोट्या बातमीसाठी मला एक रुपाया मिळाला असता, तर भाजापाने खोऱ्याने पैसे ओढले असते” असं ट्वीट देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.
And if I had a rupee for every #FakeNarrative attempted against me and our party by the opposition + #HMV s , BJP would be minting money! 🙋🏻♂️ https://t.co/yuXfnIkrPR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 31, 2022
महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली जात आहे. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, त्यांनी ‘फेक नरेटिव्ह’चा मुद्दा मांडला होता. तसेच पत्रकारांना उद्देशून त्यांनी ‘एचएमव्ही’ असा शब्द वापरला होता. देवेंद्र फडणवीस यांचं हे ट्विट बरंच चर्चेत आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare । “ये डर मुझे अच्छा लगा”; सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदे गटाला टोला
- Gulabrao Patil । “उद्धव ठाकरेंनी २२ आमदारांचंही ऐकून घेतलं नाही” ; गुलाबराव पाटलांचा टोला
- Bachchu Kadu and Ravi Rana | अखेर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद मिटला
- Ravi Rana । झुकुंगा नहीं म्हणत बच्चू कडू यांचं शक्तीप्रदर्शन, रवी राणा यांची पहिली प्रतिक्रिया
- Sushma Andhare | कसं काय पाटील बरं हाय का… असं म्हणत अंधारेंनी उडवली गुलाबराव पाटलांची खिल्ली