कॉंग्रेसचा भाजपवर पलटवार, नाना पटोले काढणार ‘फडणवीस पोलखोल’ यात्रा

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. एका बाजूला भाजप आणि शिवसेना जनसंपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या यात्रांचे आयोजन केले आहे. तर याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवस्वराज्य यात्रा तर आता कॉंग्रेसचे नाना पटोले हे ‘फडवणीस पोलखोल’ यात्रा काढणार आहेत.

कॉंग्रेसचे नेते नाना पटोले हे वारंवार भाजपवर टीका करत आहेत. आता त्यांनी भाजपच्या महाजनादेश यात्रेला उत्तर म्हणून विदर्भात फडणवीस पोलखोल यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत ते विदर्भात जिथे मुख्यमंत्री गेले तिथे जाऊन फडवणीस सरकारने जनतेची कशाप्रकारे फसवणूक केली, सांगणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Loading...

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पटोले यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. त्यांनी पूर स्थितीवरून सरकारवर टीका करताना ‘ज्या घरात दोन दिवस पाणी होतं, त्या पूरग्रस्तांना केवळ दहा किलो धान्य देण्याचा सरकारी नियम म्हणजे पूरग्रस्तांची एकप्रकारे थट्टाच आहे. पेशवा दुसरा बाजीरावही अठरापगड जातींना गांभीर्याने घेत नव्हता. संकटात असणाऱ्यांना मदतीचा हात देत नव्हता. मुख्यमंत्री फडणवीसही राज्यातील जनतेला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या बाजीरावांचा डीएनए आहे अशी टीका केली होती.

दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडून महाजनादेश यात्रा तर शिवसेनेकडून जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. तसेच याला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्राही सुरु आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे या यात्रा आता स्थगित करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातले 'खूप मोठे कीर्तनकार' ; तृप्ती देसाई आणि अंनिस संघटना हे 'धर्म नष्ट' करायला निघाले आहेत
लढवय्या इंदुरीकर महाराजांचा निर्धार, किर्तनाचा वसा सोडणार नाही...
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
स्वतःला प्रबोधनकार म्हणवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी माफी मागावी
शरद पवारांचा नाशिक दौरा रद्द, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बोलावली तातडीची बैठक