मुंबई मेट्रो लोकार्पण सोहळ्याचे फडणवीसांना निमंत्रण नाही!

मुंबई : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई मेट्रो २-ए च्या मार्गिकेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र उद्धाटन आधीच मेट्रो श्रेयाचे राजकारणाला जोर आला आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमास विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रणच देण्यात आलेले नाही. राज्य सरकारच्या निमंत्रण पत्रिकेत फडणवीसांचं नाव नसल्याने भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परंतु या निमंत्रण पत्रिकेत विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांचे नाव असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फडणवीसांचं नाव सोयीस्करित्या वगळले गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

वांद्रे परिसरात पोस्टरबाजी करत भाजपने मेट्रोचं श्रेय घेण्याचे प्रयत्न केला, शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. या बॅनरवर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस याचे फोटो होते व ‘काम केलाय.. मुंबईने पाहिलंय’ असे लिहण्यात आले होते. तसेच मुबईच्या ३३७ किमी, आणि १४०४३३ असा आशय होता. देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देण्यात आले होते.

या नाराजीनाट्यानंतर भाजपप्रवक्ते अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका केली आहे. “कोतेपणालाही लाज वाटावी असे मुख्यमंत्र्यांचे वर्तन असल्याच्या” खोचक टोला भातखळकरांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

चंदीगड पूर्ण पंजाबच्या ताब्यात द्या – भगवंत मान यांची केंद्राकडे मागणी
अनुपम खेर यांना मिठी मारून ढसाढसा रडले विवेक अग्निहोत्री; व्हिडिओ होतोय व्हायरल
‘राधे माँ’चा मुलगा आहे बॉलिवूड अभिनेता; तुम्ही पाहिलेत का?
PAK vs AUS: अबब! ५६ चौकार आणि १८ षटकार.. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेत मिळवला ऐतिहासिक विजय
IPL 2022: अजय जडेजाचे धोनीसंबधी मोठे वक्तव्य; म्हणाला ‘ त्याने जडेजा ऐवजी निर्णय घेणे थांबवावे’