‘फडणवीस हेच शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचे खरे वारसदार’

devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्ष चांगलाच तयारीला लागला आहे. पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली नातेपुते येथे नुकताच पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना जानकर यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. तसेच विरोधकांवर टीकाही केली.

महादेव जानकर यांनी विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये ते शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार आहेत असं विधान केले आहे. या विधानावरून त्यांनी विरोधकांना टीका करताना भान राहूद्या असं आवाहन केले आहे. तसेच त्यांनी आपल्याला या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील ४ जागा मिळणार असल्याचंही सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी ‘भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीच्या जागावाटप मध्ये सरकार सोबत असलेल्या शिवसंग्राम, आरपीआय, रयत क्रांती संघटना यांच्यासाठी १८ जागा देण्याचं ठरलं असल्याचं जानकर यांनी सांगितलं. रासपची शक्ती वाढल्यामुळे घटक पक्षांमध्ये मोठा भाऊ आपण असणार आहे असंही विधान त्यांनी केले आहे.

दरम्यान, पुढे बोलताना रामदास आठवले माझे कायमच मोठे भाऊ राहिले आहेत तरी राज्यात रासपची वाढलेली सत्तेतील भागीदारी जिल्हा परिषद ,पंचायत समित्या, नगरपरिषद यामध्ये वाढलेल्या बळामुळे १८ मधल्या दहा ते बारा जागा लढवणार आहे. २०१४ मध्ये काहीही नसताना सहा जागा आम्हाला मिळाल्या होत्या त्यामुळे आता १२ जागा असणार आहे असंही त्यांनी सांगितलं.