‘कोरोनाच्या संकट काळात फडणविसांच्या बिहार मधील नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड दिलासा मिळेल’

devendra fadnavis And sachin sawant

मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये होत असलेल्या निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकीबाबत सविस्तर सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत.आता राजकीय पक्षांनी देखील व्युव्हरचना आखायला सुरुवात केली असून विधानसभेतील विरोधी पक्ष नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येत्या बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

पुढच्या काही महिन्यातच बिहार विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत भाजपचे बिहार प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. पक्षातील सूत्रांच्या आधारे प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, भाजपकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

देवेंद्र फडणवीस हे बिहारमध्ये भाजपचे विद्यमान प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासोबत काम पाहतील, असे वृत्त आहे. फडणवीस गुरुवारी झालेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीलाही उपस्थित असल्याची माहिती आहे. लवकरच प्रभारीपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

बिहारमध्ये येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपची रणनीती सुरु झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं संघटन कौशल्य पाहता, त्यांना भाजपचे बिहार प्रभारी केलं जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान,याच मुद्द्यावरून कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. ट्वीट करत त्यांनी फडणवीसांना लक्ष्य करताना ते म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात फडणवीस जींच्या बिहार मधील नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड दिलासा मिळेल. भाजपा ने महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद! सन्माननीय फडणवीस जींना शुभेच्छा- “दिल्याघरी सुखी रहा”

परवानगीविना रस्ता खोदणाऱ्या कंत्राटदाराला तुकाराम मुंढे यांनी घडवली चांगलीच अद्दल

बॅडमिंटन खेळाडूंना सराव करण्यासाठी परवानगी द्यावी : क्रीडा समितीच्या बैठकीत ठराव

‘पॉझिटिव्ह’च्या संपर्कात आला असाल तर स्वत: विलगीकरणात जा; महापौर संदीप जोशी यांचे आवाहन