फडणवीस – ठाकरेंचा वाद मिटला पण माझा आणि आंबेडकरांचा काही मिटत नाही

टीम महाराष्ट्र देशा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच भाजप आणि सहयोगी पक्ष ३७० जागांवर विजयी होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ‘टोकाचा वाद मिटवलामुळे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे आभार त्यांचा वाद मिटला पण माझा आणि प्रकाश आंबेडकरांचा वाद मिटत नाही’ असं वक्तव्य केले आहे. फडणवीस-ठाकरे वाद मिटल्याने युतीला नक्कीच फायदा होईल असंही ते पुढे बोलताना म्हणाले.

भाजप-शिवसेना युतीला घवघवीत यश मिळेल आणि केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.