fbpx

देवेंद्र फडणवीस श्रीकृष्णासारखे चतुर : मंगल प्रभात लोढा

टीम महाराष्ट्र देशा : आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.

पदभार स्वीकारल्यानंतर लोढा यांनी ‘पक्षाची परंपरा असते, झाडं कोणी लावतो तर फळं दुसरा चाखतो. तसंच आज जी गर्दी झाली आहे ती माझ्यामुळे नाही तर मावळते अध्यक्ष आशिष शेलार यांच्यामुळेच’ अशा शब्दात आशिष शेलार यांची स्तुती केली तर ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व फक्त राजकीय नाही तर कामाचे नेतृत्व आहे. मला गर्व आहे देवेंद्र यांच्यात भगवान श्रीकृष्णाची चतुरता आहे’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.

दरम्यान, २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत ४८ तास आधी युती तुटली. तेव्हा आपल्या १५ जागा आल्या. आता युती झाली आहे. मुंबईत ३६ -० अशी मॅच जिंकायची आहे, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.