फडणवीस सरकारचं पालिका कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, सातवा वेतन आयोग लागू

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, येत्या २ सप्टेंबरपासून हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडण्णूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी स्थानिक स्वराज संस्थांमधील नगरपालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. येत्या २ २ सप्टेंबरपासून हा सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, राज्यसरकारच्या या निर्णयामुळे मनपा कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.