मेंढ्याच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्याकडे , फडणवीसांचा राजू शेट्टींना टोला

टीम महाराष्ट्र देशा : तिसऱ्या टप्यातील मतदान आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघातील प्रचारच्या तोफा थंडावणार आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात युतीकडून झालेल्या सभेत आघाडीचे मित्रपक्ष राजू शेट्टी यांच्यावर चांगलाच शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीतील युतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आले असता हा प्रहार केला आहे.

यावेळी फडणवीस म्हणाले की, राजू शेट्टी यांनी शरद पवारांना शिव्या दिल्या आणि तक्रारी केल्या. मात्र आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, हाच का तुमचा स्वाभिमान असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तर आता मेंढ्याच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्याला दिली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टींवर केली.

सांगली लोकसभा मतदारसंघात आघडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा सोडण्यात आली आहे. या जागेवर स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांना टक्कर देण्यासाठी युतीकडून संजयकाका पाटील यांना उतरवण्यात आल आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील गोपीचंद पडळकर सारखा दमदार उमेदवार सांगली लोकसभेच्या रिंगणात उतरवला आहे त्यामुळे सांगलीत यंदा तिहेरी लढत पहायला मिळणार आहे.Loading…
Loading...