‘पवारांचे राजकारण संपले, आता आमचं राजकारण सुरु झालंय’

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ्या मार्गाने प्रचार करत आहेत. या प्रचारात सर्वच नेते र्क्मेकांवर जोरदार टीका करतना दिसत आहेत. आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर भाष्य करताना काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते भाजपामध्ये आले आहेत. ज्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली तेच राजकारण त्यांच्या अंगलट आलं आहे. शरद पवारांचे राजकारण आता संपुष्टात आले आहे असं विधान केले आहे. त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे.

तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी तोडण्या-फोडण्याचं राजकारण केले त्यामुळे आता त्यांना हे भोगावे लागत आहे. नवीन पिढीचं राजकारण वेगळं आहे. मी शरद पवार नाही, मी देवेंद्र फडणवीस आहे आता आमचं राजकारण सुरु झालंय अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. ते एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलत होते.

पुढे बोलताना गेल्या ४ वर्षात कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप युतीच्या सरकारवर झाले नाहीत. विरोधकांनी भाषणात घोटाळ्याचे आरोप केले, विरोधकांनी एकाही आरोपाचे पुरावे दिले नाहीत. हवेत आरोप करतात, पुरावे द्यावेत, १५ वर्ष आम्ही विरोधात होतो एकही आरोप पुराव्याशिवाय लावला नाही. हायकोर्टातही आरोप सिद्ध झाले नाही असंही फडणवीस म्हणाले आहेत.