पेट्रोलवर बोला म्हणताच फडणवीसांसह भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद आटोपली

devendra fadnavis

सोलापूर: कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर आता हळूहळू जनजीवन भीतीच्या सावटाखाली सावरू लागले आहे. यामध्ये गेल्या १९ दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये दररोज वाढ होत असल्याने सामन्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. याबद्दल भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारल असताना त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेत निघून जाणे पसंत केल्याचं सोलापूरमध्ये दिसून आल आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. शहरात कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या रुग्णालयांना भेट दिली. त्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पत्रकार परिषद घेत कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रशासकीय कामामध्ये आढळणाऱ्या उणीवा त्रुटी, उपचारामध्ये करण्याच्या सुधारणा यांच्या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांनी देशभरात महाग होत असलेल्या पेट्रोल – डीझेल संदर्भात प्रश्न विचारला असता ‘मी बोललो आहे’ म्हणत त्यांनी खुर्चीवरून उठत पत्रकार संपवत निघून जाणे पसंत केले. ते जात असताना अनेक पत्रकार ‘जाऊ नका, पेट्रोलवर बोला’ अशी विनंती करत होते, मात्र फडणवीस यांच्यासह सोलापूरचे खासदार पक्षाचे सर्व आमदार आणि पदाधिकारी यांनी काढता पाय घेतला.