कारखान्यातील यंत्रमागांची धडधड गुरुवारपासून थांबणार

सोलापूर : कामगारांना लागू झालेला भविष्य निर्वाह निधी (पीएफ)कायदा मागे घेईपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय रात्री झाला. स्वातंत्र्यदिनाची सुटी आणि त्यानंतर बुधवारची साप्ताहिक सुटी घेतल्यानंतर १७ ऑगस्टपासून मागांची धडधड थांबेल. त्याला मुदत म्हणजे कायदा मागे घेणे, हाच पर्याय असल्याचे मत कारखानदारांनी मांडले. त्याला एकमुखी पाठिंबा मिळाला. भविष्य निधी कार्यालयाचे विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी कारखानदारांची युनिट पद्धत फेटाळून हा कायदा लागू होत असल्याचा निर्णय दिला. त्याच्या विरोधात कारखानदारांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली होती. गेल्या रविवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. त्याची कोणी दखल घेतली नाही म्हणून रात्री तातडीची बैठक झाली. तीत हा कायदा मागे घेईपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या बैठकीसाठी संघाचे अध्यक्ष धर्मण्णा सादूल, अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सहसचिव मल्लिकार्जुन कमटम, खजिनदार अंबादास बिंगी, सल्लागार मुरलीधर अरकाल उपस्थित होते.जीएसटी (वस्तू, सेवाकर) लागू झाल्यानंतर या उद्योगात मोठी मंदी आली. पक्कामाल पडून आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासूनच कामाचे तास कमी झाले. त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर झाला. कायदा मागे घेईपर्यंत कारखाने बंद ठेवून सरकारचे लक्ष वेधणार. बंद काळातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी स्वतंत्र बैठक होईल. प्रचंड सवलती घेऊन कामगारांना ठेंगा दाखवणाऱ्या कारखानदारांची ही कुठली प्रवृत्ती म्हणायची? त्यांच्या विरोधात कामगार रस्त्यावर येतील. – विष्णूकारमपुरी, प्रदेश सचिव, कामगार सेना

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...