Facebook- फेसबुकचे वाय-फाय लोकेटर

फेसबुक काही महिन्यांपासून आयओएस युजर्सच्या माध्यमातून फाईंड वाय-फाय या फिचरची चाचणी घेत होती. आता हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालीच्या युजर्सला देण्यात आले आहे. अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी मोफत वाय-फाय हॉटस्पॉट असले तरी स्मार्टफोनधारकांना याची नेमकी माहिती नसते. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन ही सुविधा देण्यात आली आहे. मोबाईलवरून फेसबुक वापरणार्‍यांना मोअर या टॅबवर क्लिक केल्यावर त्याच्या भोवती असणार्‍या वाय-फाय हॉटस्पॉटची माहिती नकाशावर दिसते. यात संबंधीत वाय-फाय हे कुणातर्फे पुरविण्यात येत आहे? याची माहितीदेखील देण्यात आलेली असते