फेसबुक, व्हाट्सअप आणि इन्स्टा डाऊनचा टेलिग्रामला फायदा; ७ कोटी नव्या युजर्सची भर

मुंबई :  फेसबूक, इन्स्टा आणि व्हाट्सअप अ‍ॅपप्लिकेशन ४ ऑक्टोंबर २०२१ रोजी ९:१५ वाजेच्या सुमारास संध्यकाळी बंद पडले होते. त्यानंतर तब्बल ७ तासानंतर हे अ‍ॅप्स परत सुरु करण्यात आले आहे. अचानक बंद पडलेल्या या अ‍ॅप्समुळे अनेकांची धांदल उडाली. बऱ्याच जणांना वाटले कि आपला फोन बिघडला, नेट प्रोब्लम असणार असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थिती झाले होते. त्यानंतर एकमेकांसोबत चर्चा केल्यानंतर लक्षात आले की, अ‍ॅप्स बंद पडले आहे समजले. मात्र यानंतर याचा मोठा तोटा फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गने यांना सहन करावा लागला. परंतु टेलिग्रामला याचा मोठा फायदा झाला असून टेलिग्रामला तब्बल ७ कोटी नवे युझर्स मिळाले आहेत.

व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, फेसबुकची बंद झालेल्या सेवेचा फायदा सोमवारी टेलिग्रामला मिळाला. या दरम्यान टेलिग्रामला तब्बल ७ कोटी नवे ग्राहक मिळाल्याची माहिती टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव  यांनी दिली. टेलिग्रामवर दररोज येणाऱ्या युझर्सची संख्या वाढली आणि आम्ही तब्ब्ल ७ कोटी नव्या युझर्सचं स्वागत केलं असल्याची प्रतिक्रिया दुरोव यांनी दिली आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम सहा तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी बंद राहिल्यामुळे मार्क झुकरबर्गने फेसबुक पोस्ट शेअर करत युजर्सची माफी मागितली. मंगळवारी (दि.४) पहाटे चारच्या सुमारास ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, Facebook, Instagram, आणि WhatsApp सर्वर डाऊन का झाला हे अजून स्पष्ट झालं नाही. मात्र हे तिन्ही अ‍ॅप्स बंद झाल्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. परंतु या अडचणीत टेलिग्रामला मोठा फायदा झाला.

महत्वाच्या बातम्या: