रक्ताची गरज आहे का? फेसबुक करेल तुमची मदत.

रक्ताची गरज असलेल्या गरजूंना फेसबुकचा मदतीचा हात.

अनेक वेळा सोशल माध्यमावर तातडीने रक्ताची गरज आहे या क्रमांकावर संपर्क साधा असे मेसेज फिरत असतात. पण तरीही अनेक वेळा गरजूंना रक्त मिळत नाही. भारतातील हीच रक्ताची गरज भागविण्यासाठी व गरजूंना मदत करण्यासाठी फेसबुक सरसावले आहे.

१ ऑक्टोबर हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर फेसबुक आपल्या युजरला मदत करण्यासाठी एक फिचर अॅड करत आहे.या फिचर मध्ये फेसबुक आपल्या युजरला त्यांचा रक्तगट सतत विचारेल याबरोबरच संपर्क साधण्यासाठी फोन क्रमांक देखील विचारेल. ज्या गरजूंना तातडीने गरज आहे ते गरजू आपली माहिती यामध्ये टाकू शकतात.माहिती टाकल्यानंतर फेसबुक त्या संबधित रक्तगटाच्या व्यक्तीना त्याचे नोटीफिकेशन देईल. गरजूंना यामध्ये सविस्तर माहिती द्यावी लागेल जसे की पत्ता ,रक्तगट, हॉस्पिटलचे नाव इत्यादी.

You might also like
Comments
Loading...