Facebook Publication – फेसबुकवर प्रकाशकांसाठी लवकरच पेड सबस्क्रिप्शन

फेसबुकने २०१५ साली इन्स्टंट आर्टीकल्स सादर केले आहे. याच्या माध्यमातून वेबसाईटवर रिडायरेक्ट न करता अतिशय वेगवान पध्दतीने फेसबुक पेजवरच संबंधीत वेब पेज उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे. यावरील जाहिरातीचे उत्पन्न संबंधीत प्रकाशक आणि फेसबुक यांच्यात वाटले जाते. इन्स्टंट आर्टीकल्स सुरू करतांनाच प्रकाशकांनी पेड सबस्क्रिप्शनची मागणी केली होती.फेसबुकने अधिकृतरित्या काहीही भाष्य केले नसले तरी येत्या काही महिन्यात ही सेवा सुरू होणार असल्याचा दावा डिजीडेच्या वृत्तात करण्यात आला आहे.