१२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक ! क्विझ अॅप वापरणाऱ्यांचा डेटा लिक

फेसबुककडून अशी क्विझ अॅप वापरणाऱ्यांचा डेटा नुकताच लिक झाला आहे. नेमटेस्टस (NameTests) या क्वीझ अॅपकडून नुकताच १२ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा लिक झाला असल्याचे समोर आले आहे.

फेसबुकच्या युआरएलवरुन युजर्सची माहिती काढली जात असल्याचे सायबर सुरक्षेतील तज्ज्ञांच्या लक्षात आले आहे. विशेष म्हणजे युजरनी हे अॅप्लिकेशन डिलीट केले तरीही त्यांचा डेटा हॅकर्सकडे राहणार आहे.

त्यामुळे भविष्यात सोशल मीडियाचा वापर करताना आणि विशेषकरुन अशाप्रकारची अॅप्लिकेशन्स वापरताना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

फेसबुक डेटा चोरी प्रकरण:केंब्रिज अॅनालिटिका आणि कॉंग्रेस-भाजपा

 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत काय केलं ? मुंबई उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल