मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळाले. तसेच अनेक जणांनी राज ठाकरेंची भूमिका बदलल्याचे आरोपही केले. असे असतांनाच आता सोशल मीडियावर महाविकास आघाडी निर्माण होण्यापूर्वी शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर झालेली टीका चर्चेचा विषय ठरत आहेत. फक्त इतकेच नाही तर या जुन्या फेसबुक पोस्ट अथवा व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत.
नेटकरी सोशल मीडियावर शिवसेनेच्या जुन्या पोस्ट उखरुन काढत आहेत. यामध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. या जुन्या पोस्टमुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंवर भूमिका बदल्याची टीका होत असताना शिवसेना कुठं आपल्या भूमिकेवर ठाम आहे?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होत आहे.
‘मुतऱ्या’ तोंडाचे म्हणत अजित पवारांवर केली होती टीका
सध्या सोशल मीडियावर २०१८ चा सामना अग्रलेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या अग्रलेखात अजित पवार काकांच्या पुण्याईने व कृपेनेच तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात, अशा शब्दात घणाघाती टीका करण्यात आली आहे.
शरद पवारांवरही केली होती टीका
शिवसेनेच्या फेसबूक पेजवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवार हे जरी मित्र असले तरी ती नीच प्रवृत्ती आहे, असे म्हणत टीका केली आहे. ही पोस्ट २०१२ ची असून पुन्हा एकदा ही पोस्ट चर्चेत आली आहे. राज्यात कधीकाळी कट्टर विरोधक असणारे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस यांचे सरकार असल्याने शिवसेनेने सत्ता स्थापन करण्यासाठी भूमिका बदल्याची टीका नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, इतक्या वर्षांनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जुन्या पोस्ट आणि बातम्या चर्चेत आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळत आहे.
तसेच या सर्व व्हायरल पोस्टवर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…दंगल वगैरे सगळ्या राष्ट्रवादीला हव्या असलेल्या गोष्टी”; मनसेचे टीकास्त्र
- उर्वशी रौतेला ‘oops’ मूमेंटची शिकार; पहा काय आहे नेमकं प्रकरण
- “प्रभागातील मुस्लीम नागरीकांमध्ये दहशत, माझी अडचण होतीये”; वसंत मोरे
- संजय राऊतांची संपत्ती ईडीकडून जप्त; भाजपला इशारा देत म्हटले, “तुम्ही तुमची कबर…”
- “महाराष्ट्र पेटवू नका”, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती