fbpx

व्हायरल सत्य- फेसबुक वर BFF लिहिल्याने प्रोफाइल सुरक्षित होते का?

Bff Meaning

मनोज जाधव – फेसबुक डाटा लीक नंतर बर्याच खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. त्यात काही खर्या तर काही खोट्या. तसेच फेसबुक वर एक पोस्ट व्हायरल होत आहे . फेसबुक वर खूप लोक BFF ची पोस्ट शेयर करताना आपल्याला दिसत आहेत. त्यात सांगितले जात आहे कि, फेसबुक चे सीईओ मार्क झुकरबर्गने फेसबुक अकाउंट सुरक्षित करण्यासाठी BFF चा वापर करा असे सांगितले. BFF लिहिल्यावर ते हिरवे झाले तर तुमचे फेसबुक अकाउंट सुरक्षित आहे आणि नाही झाले तर धोक्यात आहे.

बरेच लोक सत्य न तपासता BFF कमेंट करताना आपल्याला दिसत आहे. यावर विश्वास ठेवून ते मित्रासोबत  शेयर करत आहेत. ज्याचे नकारात्मक परिणाम समोर आले आहेत. हा एक खोटा मेसेज आहे जो चुकीच्या माहितीने व्हायरल होत आहे.  फेसबुक चे सीईओ मार्क झुकरबर्गने कुठेही अधिकृतरित्या या BFF बद्दल सांगितलेले नाही.

BFF चा अर्थ काय?
हे फेसबुक ने दिलेले Text Delight फीचरआहे. याचा अर्थ (BFF) Best Friends Forever असा होतो.  हाई फाई करताना हात आपल्याला बघयला मिळतात.  जसे Best Wishes, Congratulations,You Got This असे लिहिल्या नंतर आपल्याला दिसते. याचाच अर्थ  BFF लिहिल्यावर अक्षर ग्रीन (हिरवे ) झाले याचा अर्थ तुमचे फेसबुक प्रोफाइल सुरक्षित असल्याच साइन नाही आहे. तुम्ही असल्या खोट्या टिप्स वापरू नका. खरे तर फेसबुक ने अभिनंदन, बधाई लिहिल्यावर केशरी रंग येणारे फीचर आणले होते, तसेच हे फीचर आहे. ‘BFF’ चा  पूर्ण अर्थ ‘बेस्ट फ्रेंड फॉरऐवर’ आहे.  हे फेसबुक प्रोफाइल सुरक्षित असल्याच सांगत नाही.

तुमचे फेसबुक प्रोफाइल सुरक्षित ठेवण्यासाठी खालील टिप्स वापरा

प्रोफाइल च्या सेटिंग्स मध्ये जाऊन ‘टू फैक्टर ऑथेंटिकेशन’ हे इनेबल करा. ही सेटिंग इनेबल केल्यावर तुमचा पासवर्ड कोणाला कळला तरी तो तुमचे  प्रोफाइल एक्सेस करू शकणार नाही. फेसबुक अकाउंट वर जाऊन लोकेशन सेटिंग आणि फेस रिकॉग्निशन सेटिंग बंद करा.

प्राइवेसी सेटिंग्स 

अकाउंट, ईमेल, नंबर या पोस्ट हे जर तुम्हाला कोणाला दाखवाचे नसेल तर अकाउंट मध्ये जाऊन फ्रेंड रिक्वेस्ट, फ्रेंड लिस्ट, ई-मेल, फोन नंबर ची प्राइवेसी नुसार सेट करा. दुसऱ्या सिस्टम वर फेसबुक लॉग इन करण्याचे टाळा.

2 Comments

Click here to post a comment