Facebook Group Video Chat- ग्रुप व्हिडीओ चॅटींगसाठी फेसबुकचे अ‍ॅप

फेसबुक लवकरच ग्रुप व्हिडीओ चॅटींगसाठी स्वतंत्र अ‍ॅप सादर करणार असून हे हाऊसपार्टी या अ‍ॅपचे हुबेहुब कॉपी असेल अशी माहिती समोर आली आहे.

येत्या काही महिन्यात जगभरातील युजर्सला ते सादर करण्यात येईल असे मानले जात आहे. हे अ‍ॅप ग्रुप व्हिडीओ चॅटींगसाठी खास विकसित करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार बोनफायर हे हाऊसपार्टी या अ‍ॅपची कॉपी असल्याचे समजते. हाऊसपार्टी या अ‍ॅपमध्ये फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या व्यक्तीने अ‍ॅप सुरू केले असल्यास त्याच्या मित्रांना नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळते. यानंतर त्याच्या यादीतील सर्व युजर्स हे एकमेकांशी ग्रुप व्हिडीओ चॅटींग करू शकतात. हे अ‍ॅप सध्या अमेरिकेतील टिन एजर्समध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. यामुळे याची क्लोनींग करून फेसबुक या अ‍ॅपला तगडे आव्हान उभे करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.