जगभरात फेसबुक सह इंस्टाग्राम बंद

facbook down

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सर्वात लोकप्रिय एप म्हणजे फेसबुक. मात्र सध्या फेसबुक हे अचानक बंद झाले आहे. फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाल्याने शनिवारी सायंकाळी काही वेळासाठी फेसबुक बंद झाल्याचं चित्र पहायला मिळालं .फेसबुक सोबतच इन्स्टाग्राम आमी फेसबुक मेसेंजरही सध्या बंद आहे.

फेसबुकचा सर्व्हर डाऊन झाल्याने जगभरात फेसबुकचा वापर करणारे करोडो लोक काही वेळासाठी हैराण झाले. लॉगइन तसेच अपलोडिंग करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर युजरला अडचणी निर्माण होत आहेत. जगभरात करोडोंच्या संख्येने लोक फेसबुक वापरतात.

आज फेसबुक हे एक करमणुकीच साधन न राहता अनेकांच्या दैनंदिन व्यवहारा एक भाग बनले आहे. फेसबुक साईट आज अचानक डाऊन झाल्याने काहीना जिव गुदमरल्या सारखे झाले आहे. मात्र या तांत्रिक बिघाडाविषयी फेसबुककडून काहीही सांगण्यात आले नाहीय. दरम्यान काही नेटीझंसकडून हा जगातील सर्वात मोठा सायबर अटक असल्याचे ट्विट केले जात आहेत.