पंतप्रधान होऊन १६५४ दिवस झाले , आतातरी पत्रकारांना सामोरं जा

टीम महाराष्ट्र देशा : ‘प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. तुम्हाला पंतप्रधान होऊन १६५४ दिवस झाले आहेत. तरीही अजून एकही पत्रकार परिषद नाही ? हैदराबाद येथील पत्रकार परिषदेतील काही छायाचित्रे तुमच्यासाठी शेअर करत आहे. कधीतरी प्रयत्न करा. प्रश्नांच्या भडीमाराचा सामना करणे मजेशीर असते’, असं ट्विट करून काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार दौरा संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. हैदराबाद येथील पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.

You might also like
Comments
Loading...