कोरोनाच्या लढाईत गाफील न राहता एकजुटीने सामना करा- आ. अंबादास दानवे

औरंगाबाद : कोरोना विरुद्धची लढाई अजून संपलेली नाही शहरात काही प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी गाफील राहू नका. प्रशासन, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, नागरिकांनी एकजुटीने सामना करण्याची गरज आहे. कोरोनाला हरवण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या त्रिसूत्री नियमावलीचे काटेकोर पालन करावे. प्रत्येक शिवसैनिकांनी शासनाच्या नियमावलीचे आपापल्या वार्डात जनजागृती करावी, असे आवाहन शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे.

शिवसेनेच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यात ‘निर्धार कोरोन मुक्त गाव मोहीम’ सुरू आहे. या अंतर्गंत आमदार दानवे यांनी औरंगाबाद मध्य मतदार संघातील चेतनानगर, श्रीकृष्णनगर, औरंगपुरा, नागेश्वरवाडी या भागात कार्यकर्ते पदाधिकारी यांची बैठक घेतली, त्या वेळी ते बोलत होते. आमदार दानवे यांनी वॉर्डात दीड ते दोन महिन्यापूर्वी कोरोना प्रादुर्भाव वाढत असतानांची परिस्थिती व आजची परिस्थिती याविषयी माहिती घेऊन पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर शासनाने सांगितलेली त्रिसूत्री सर्वांनी पाळण्याचे आवाहनही या वेळी दानवे यांनी केले. या मोहीमेनिमित्त आमदार दानवे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच भागांना भेटी देत आहेत. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असली तरी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी या निमित्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या