‘आँखें भी होती है दिल की ज़ुबान’; प्राजक्ता माळीचा खास अंदाज

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय  असते. ती नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिचे चाहते देखील तिच्या या फोटोंवरती भरभरून कमेंट करत असतात. नुकतेच प्राजक्ता माळीने सोशल मिडीयावर हटके अंदाजातील फोटो शेअर केला आहे.

प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमधील तिचा लुक घायाळ करणारा आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तसेच हा फोटो शेअर करत ‘आँखें भी होती है दिल की ज़ुबान, Background हेच गाणं वाजतय’, अस भन्नाट कॅप्शन दिले आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या सुंदरतेने तसेच आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. प्राजक्ताच्या अभिनयावर तिचे चाहते फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या