Share

Eye Care Tips | नजर कमी होतेय? तर करा हे घरगुती उपाय

बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. कारण या तंत्रज्ञानाच्या युगात आपण मोबाईल लॅपटॉप टीव्ही चा सारखा वापरत असतो. त्यामुळे डोळ्यांच्या अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. वाढत्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे आपली नजर कमी होऊ लागते. जर तुमची ही नजर कमी होऊ लागली असेल आणि तुम्हाला डोळ्याचे त्रास होत असेल तर या बातमीतील हे घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो. आणि डोळ्याची कमी होणारी नजर वाढवू शकतो.

आवळा

आवळा तुमच्या डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी उपलब्ध असते. त्याचबरोबर आवळ्यामध्ये अँटि-ऑक्सिडेंट सारखे पोषक घटक सुद्धा उपलब्ध आहेत. आवळ्याचा रस रोज पाण्यात मिसळून प्यायल्याने तुमच्या डोळ्याला अनेक फायदे मिळू शकतात.

बदाम

बदामामध्ये आढळणारे अँटि-ऑक्सिडेंट घटक डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे बदामाचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बदामाचे सेवन तुम्ही दुधासोबत करू शकता किंवा रात्री बदाम भिजून दुसऱ्या दिवशी सकाळी ते खाऊ शकता.

ड्रायफ्रूट्स

बदामा व्यतिरिक्त अशी अनेक ड्रायफ्रूट्स आहे जे तुमच्या डोळ्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतील. त्यामध्ये प्रामुख्याने मनुका आणि अंजीर यांचा समावेश होतो. मनुका आणि अंजीर मध्ये असलेले पोषक घटक आपले डोळे निरोगी ठेवतात.

विटामिन ए

डोळ्यांसाठी सर्वात फायदेशीर आहे विटामिन ए. विटामिन ए चा आपल्या दररोजच्या जीवनात समावेश करा त्यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतील. गाजर, पपई आणि पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन ए उपलब्ध असते. त्यामुळे तुमच्या आहारात यांचा समावेश करा.

वरील गोष्टींसाठी तुम्ही तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या 

बदलत्या काळानुसार आणि बदलत्या वयानुसार आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. यामध्ये प्रामुख्याने आपल्याला डोळ्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. …

पुढे वाचा

Health

Join WhatsApp

Join Now